manipur violence video: मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरण; आक्रमक महिलांकडून तीव्र आंदोलन | पुढारी

manipur violence video: मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरण; आक्रमक महिलांकडून तीव्र आंदोलन

पुढारी ऑनलाईन: मणिपूर हिंसाचारादरम्यान महिलांसोबत घडलेल्या अत्याचार प्रकरणाने पुन्हा हिंसात्मक वातावरण निर्माण झाले आहे. काल संतापलेल्या महिलांच्या जमावाने आरोपीचे राहते घर जाळले. तर आज (दि.२२ जुलै) इम्फाळमध्ये महिला आंदोलकांनी घारी परिसरात मुख्य रस्त्यात अडवत आंदोलन केले. दरम्यान महिलांनी रास्ता रोको करत, टायर जाळत या घटनेविषयी (manipur violence video)  सलग दुसऱ्या दिवशी संताप व्यक्त केला.

आंदोलकांना शांत करण्यासाठी मणिपूर सशस्त्र पोलीस, लष्कर आणि जलद कृती बटालियन घटनास्थळी दाखल झाले. एका कारवाईत त्यांनी आग विझवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी अनेक भागात फ्लॅग मार्च (manipur violence video) काढण्यात येत आहे.

मणिपूर हिंसाचारादरम्यान महिलांसोबत घडलेल्या अत्याचारप्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर यातील सर्व आरोपींना पकडून कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही या आरोपींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना (manipur violence video) दिलेत.

मणिपूर राज्यात 3 मे पासून इम्फाळ खोऱ्यात एकवटलेले बहुसंख्य मेतेई आणि टेकड्या व्यापलेल्या कुकी यांच्यात वांशिक संघर्ष होत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला तेव्हा राज्यात हिंसाचार उसळला.

हेही वाचा:

 

Back to top button