Titan submarine : टायटन पाणबुडी अब्जाधीशांसाठी ट्रॅप

Titan submarine
Titan submarine
Published on
Updated on

कॅनबेरा; वृत्तसंस्था : अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडीही दुर्घटनाग्रस्त होऊन बुडाली. या दुर्घटनेने 5 अब्जाधीशांचे बळी घेतले. टायटन पाणबुडी ही अब्जाधीशांसाठी तयार करण्यात आलेला एक ट्रॅप होता, असे खळबळजनक विधान आता दुर्घटनेतील मृत तसेच टायटन पाणबुडीचे निर्माते ओशनगेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॉकटन रश यांचे मित्र कार्ल स्टॅनली यांनी केला आहे.

स्टॅनली यांच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. टायटॅनिकचे अवशेष दाखवणारी सागरी सहल जीवघेणी ठरू शकते, याची माहिती असतानाही त्यांनी पाणबुडी बनवण्याचे काम सुरूच ठेवले. स्टॉकटन यांनी प्रसिद्ध होण्यासाठी स्वत:चा जीव तर धोक्यात घातलाच, अन्य चार जणांचे जीवही घेतले. पाणबुड्या सामान्यतः स्टील किंवा टायटॅनियमसारख्या धातूंनी बनविल्या जातात. टायटनची निर्मिती एअरोस्पेस ग्रेड कार्बन फायबरपासून केली गेली. 2019 मध्ये टायटनची चाचणी झाली तेव्हा स्टॅनलीही या पाणबुडीत होते. खोल समुद्रात जाणे म्हणजे जीव गमावणे, तेथे दर 3-4 मिनिटांनी बंदुकीच्या गोळ्यांसारखे आवाज येत होते. कार्बन फायबरच्या ट्यूबमध्ये बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली याबाबत मला शंका नाही, असेही स्टॅनली यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news