Stock Market Closing Bell | विक्रमी तेजी कायम! सेन्सेक्स २०५ अंकांनी वाढून बंद, मार्केटमध्ये नेमकं काय घडलं?

Stock Market Closing Bell | विक्रमी तेजी कायम! सेन्सेक्स २०५ अंकांनी वाढून बंद, मार्केटमध्ये नेमकं काय घडलं?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेत, हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या वाढत्या ओघामुळे भारतीय शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने (Sensex) ३५० अंकांनी वाढून ६६,९४० वर झेप घेतली. तर निफ्टी (Nifty) १९,८०० जवळ पोहोचला. त्यानंतर सेन्सेक्स २०५ अंकांच्या वाढीसह ६६,७९५ वर बंद झाला. तर निफ्टी ३७ अंकांनी वाढून १९,७४९ वर स्थिरावला.

क्षेत्रीयमध्ये मेटल निर्देशांक १ टक्‍क्‍याने आणि रियल्टी निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्‍क्‍यांने घसरला, तर पॉवर इंडेक्स ०.६ टक्‍क्‍यांनी आणि आयटी इंडेक्स १ टक्‍क्‍याने वाढला. (Stock Market Closing Bell) बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.४५ टक्क्यांनी घसरला.

सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ३.७४ टक्के वाढून १,४७६ रुपयांवर पोहोचला. त्यासोबतच एशियन पेंट्स, एचसीएल टेक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, विप्रो हे शेअर्सही वाढले. तर एसबीआय, टायटन, बजाज फायनान्स, सन फार्मा, टाटा मोटर्स, टाटा स्टील हे शेअर्स घसरले.

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची उसळी

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) गौतम अदानी यांनी भागधारकांना संबोधित केल्यानंतर मंगळवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर (Adani Enterprises shares) सुमारे ४ टक्क्यांनी वाढले. एसीसी (ACC) वगळता अदानी समूहातील अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल, अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट्स हे ८ स्टॉक्स सुमारे १ टक्क्यांनी वाढले. हिंडेनबर्गचा अहवाल चुकीच्या माहितीच्या आधारावर असून विशिष्ट हेतूने अदानी समुहाला लक्ष्य करत बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असे दावा अदानी यांनी केला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अदानींनी 'व्हर्च्युअल' माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंडेनबर्गचे सर्व आरोप फेटाळून लावले. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ

NSE वरील आकडेवारीनुसार, १७ जुलै रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ७३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) ६४.३४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. या महिन्यात १७ जुलै पर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी १४,६५५ कोटी रुपयांचे शेअर्सची खरेदी केली तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ८,०६५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. जून महिन्यात, FII ने २७, २५० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले तर DII ने ४,४५८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news