Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची विक्रमी घौडदौड सुरुच! ‘या’ हेवीवेट शेअर्समध्ये जोरदार खरेदी | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची विक्रमी घौडदौड सुरुच! 'या' हेवीवेट शेअर्समध्ये जोरदार खरेदी

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड सुरुच आहे. आज मंगळवारी सेन्सेक्स ३५० अंकांनी वाढून ६६,९४० वर खुला झाला. तर निफ्टी १९,८०० जवळ पोहोचला. सेन्सेक्स, निफ्टीचा हा नवा उच्चांक आहे. बाजारातील तेजीत बँकिंग, फायनान्सियल शेअर्स आघाडीवर आहेत. हेवीवेट स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी आणि परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातील वाढती गुंतवणूकही शेअर बाजारातील तेजीला कारण ठरली आहे. (Stock Market Today०

सेन्सेक्स काल ६६,५८९ वर बंद झाला होता. तो आज ६६,८२८ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ६६,९८५ पर्यंत झेप घेतली.

अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी आहे. या तेजीचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारानेही आज उसळी घेतली. हेवीवेट स्टॉक्स एचडीएफसी आणि आयसीआयसीआयमधील जोरदार खरेदीच्या पार्श्वभूमीवर निफ्टी बँकेने ४५,९०५ वर जात नवीन उच्चांक गाठला.

सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक. हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वाढले आहेत. भारती एअरटेल, टायटन, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक, सन फार्मा हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टीवर इन्फोसिस, विप्रो, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँक हे वाढले आहेत. तर टायटन कंपनी, डॉ. रेड्डीज लॅब्स, एचडीएफसी लाइफ आणि सन फार्मा यांचे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Today)

 हे ही वाचा :

Back to top button