

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवार २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ( Rahul Gandhi plea )
२०१९ लोकसभा निवडणूक प्रचार सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याप्रकरणी सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालास आव्हान देणारी याचिका राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे राहुल गांधी यांच्या वतीने युक्तीवाद करतील. या प्रकरणी तत्काळ सुनावणी व्हावी, अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.
हेही वाचा :