पुन्हा खोके… विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन | पुढारी

पुन्हा खोके... विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्क : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधीमंडळाचे कामकाज सुरू होण्यापुर्वी आजही विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरत घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिंतेंद्र आव्हाड, अनिल देशमुखही सहभागी झाले होते.

विरोधाकांच्या जोरदार घोषणाबाजीने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. शेतकरी विरोधी कलंकीत घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो, असा बॅनरही यावेळी झळकावण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाले होते. यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आमदार सहभागी झाले होते. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केलेल्या आंदोलनात शरद पवार गटाचे आमदार सहभागी झाले नव्हते.

हेही वाचा : 

Back to top button