

सोमवारी (दि.१७) संध्याकाळी जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील सिंधरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस आणि इतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. रात्री 11.30 च्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबारही झाला. यानंतर रात्रभर दहशतवाद्यांना घेरून नजर ठेवण्यात आली. या चकमकीत सुरक्षा दलांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. (Jammu and Kashmir)
हेही वाचा