केंद्राच्या ‘त्‍या’ अध्यादेशाला काँग्रेस विरोध करेल : आप खासदार राघव चढ्ढांचा दावा | पुढारी

केंद्राच्या 'त्‍या' अध्यादेशाला काँग्रेस विरोध करेल : आप खासदार राघव चढ्ढांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्र सरकारने दिल्‍ली सरकारविरोधात जारी केलेल्‍या अध्यादेशाला काँग्रेस विरोध करणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी केला आहे. काँग्रेसने दिल्ली सरकारविरोधातील अध्यादेशाला आपला स्पष्ट विरोध जाहीर केल्याचे त्‍यांनी ट्विट केले आहे. दरम्‍यान, काँग्रेसने आमला सहकार्याचा हात दिल्‍याने आता बंगळूर येथे १७ आणि १८ जुलै रोजी होणार्‍या बैठकीला आपचे प्रतिनिधी उपस्‍थित राहतील, असे मानले जात आहे.

आम आदमी पक्षाने आज ( दि. १६) दुपारी ४ वाजता राजकीय घडामोडी समितीची (पीएसी) बैठक बोलावली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे rh बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर बंगळूर येथे विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्‍या एकजुटीसाठी बंगळूर येथे विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यामध्‍ये २४ राजकीय पक्ष सहभागी होतील, असे मानले जात आहे. मात्र या बैठकीबाबत आम आदमी पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

हेही वाचा :

 

Back to top button