SBSP-NDA Alliance : उ. प्रदेशमध्‍ये भाजपला मिळाला नवा मित्र, लोकसभेसाठी ‘सुभासप’बरोबर युती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍यासह अमित शहांसोबत ओपी राजभर यांनीही ट्विट करून रालोआ आणि 'सुभासप' यांच्या युतीची पुष्टी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍यासह अमित शहांसोबत ओपी राजभर यांनीही ट्विट करून रालोआ आणि 'सुभासप' यांच्या युतीची पुष्टी केली आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : समाजवादी पार्टीशी आघाडी तोडल्‍यानंतर आता उत्तर प्रदेशमधील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (सुभासप) भाजप नेतृत्त्‍वाखालील 'रालोआ' बरोबर युती केली आहे. आता आगामी लोकसभा निवडणूक भघजप आणि 'सुभासप'पक्षाबरोबर एकत्रीत लढविणार आहेत. उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्‍ये या पक्षाचा प्रभघव आहे. मागील लोकसभा निवडणुकीत येथे भाजपला काही जागा गमवाव्‍या लागल्‍या होता. या युतीमुळे उत्तर प्रदेशमध्‍ये भाजपचे स्‍थान अधिक भक्‍कम होईल, असे मानले जात आहे. ( SBSP-NDA Alliance )

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍यासह अमित शहांसोबत ओपी राजभर यांनीही ट्विट करून रालोआ आणि 'सुभासप' यांच्या युतीची पुष्टी केली आहे. अमित शाह यांनी ट्विट केले की ओपी राजभर यांना दिल्लीत भेटले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. एनडीए परिवारात मी त्यांचे स्वागत करतो.राजभरजींच्या येण्याने उत्तर प्रदेशातील NDA बळकट होईल आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDA कडून गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

ओपी राजभर यांनी ट्विट केले की, भारतीय जनता पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष सामाजिक न्याय देशाच्या रक्षणासाठी, सुरक्षितता, सुशासन, वंचित, शोषित, मागास, दलित, महिला, शेतकरी, तरुण, प्रत्येक दुर्बल वर्गासाठी एकत्रितपणे लढा देतील.

SBSP-NDA Alliance : पूर्वांचलमध्‍ये 'सुभासप'चा प्रभाव

पूर्वांचलमधील लोकसभेच्‍या महत्त्वाच्या जागांपैकी गाझीपूर, घोशी आणि जौनपूर लोकसभा जागा गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गमावल्या होत्या. सपा-बसपामुळे तिन्ही जागा बसपाच्या खात्यात गेल्या. आता या सर्व जागांवर भाजपचे पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे 'सुभासप'सोबत एकत्र आल्यानंतर भाजपला चांगली व्होट बँक मिळणार हे निश्चित, त्यामुळे भाजपचा विजयाचा मार्ग सुकर होईल, असे मानले जात आहे.

सुभासपचे प्रमुख ओपी राजभर यांनी अखिलेश यादव यांनी रस्त्यावर उतरुन सत्ताधारी भाजपविरोधात लढावे. आगामी लोकसभा निवडणुका सपा आणि बसपाने एकत्र लढवाव्यात, असे आवाहन केले होते. मागासवर्गीय आणि दलितांसाठी दोन्ही पक्ष लढत असताना स्वतंत्रपणे निवडणुका कशाला लढवायच्या, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र अखिलेश यादव यांनी त्‍यांचा प्रस्‍ताव धुडकावला. त्‍यानंतर आता त्‍यांनी भाजप नेतृत्त्‍वाखालील रालोआमध्‍ये प्रवेश केला आहे.

सुभासप आणि सपा यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या होत्या. सुभासपने १८ जागा लढवल्‍या होत्‍या. त्‍यातील सहा जागा जिंकल्‍या होत्‍या. तर २०१७ च्‍या विधानसभा निवडणुकत हा पक्ष भाजपसोबत होता. राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारमध्ये सामील झाला, परंतु नंतर पक्षाने राज्‍य सरकारमधून बाहेर पडले होते. सरकारपासून वेगळे केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news