पंजाब, हरियाणात पुरामुळे आतापर्यंत ५७ मृत्‍युमुखी, ५१८ गावे बाधित, पुन्‍हा अतिवृष्‍टीचा इशारा | पुढारी

पंजाब, हरियाणात पुरामुळे आतापर्यंत ५७ मृत्‍युमुखी, ५१८ गावे बाधित, पुन्‍हा अतिवृष्‍टीचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाब आणि हरियाणा राज्‍यांमध्‍ये आता पुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. दोन्ही राज्यांमधील ५१८ गावे अद्याप पुराच्या विळख्यात आहेत. दोन्ही राज्यात पुरामुळे आतापर्यंत ५७ जण मृत्‍युमुखी पडले आहेत. हरियाणामध्ये २४ तासांत ४०३ नवीन गावे आणि पंजाबमध्ये ११५ गावांना पुराच्‍या पाण्‍याने वेढा दिला आहे. हरियाणातील एकूण १३८५ गावांना पुराचा फटका बसला आहे. दरम्‍यान, हवामान खात्याने पंजाब आणि हरियाणामध्ये चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्‍यामुळे प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. ( Flood in North India )

हरियाणातील सिरसा येथील पनिहारी, मुसाहिब वाला आणि रंगा येथे चार ठिकाणी बंधारा फुटला असून, घग्गरच्या पाण्याची पातळी ४८ हजार क्युसेकपेक्षा जास्त झाली आहे. पंजाबमध्ये पूरग्रस्त भागातून २५ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे तर ३३०० अजूनही मदत शिबिरांमध्ये आहेत.

Flood in North India : हरियाणात ४३ हजार ८३३ पूरग्रस्‍तांना सुरक्षित स्थळी हलवले

हरियाणात ४३ हजार ८३३ पूरग्रस्‍तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जालंधरमधील ६०, संगरूरमधील १६, फिरोजपूरमधील १५ आणि फाजिल्कामधील १० गावे याशिवाय अन्य जिल्ह्यातील १५ गावे पुरातून बाहेर आलेली नाहीत. महसूल विभागाच्या अहवालानुसार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण बेपत्ता आहेत.

पंजाबमध्ये आतापर्यंत पतियाळा, जालंधर, कपूरथला, पठाणकोट, तरन तारण, फिरोजपूर, फतेहगढ साहिब, फरीदकोट, होशियारपूर, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आणि संगरूर जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत सरकारचे लक्ष आता माणसे आणि जनावरांच्या आरोग्यावर आहे. पशुसंवर्धन विभागाने जनावरांची लसीकरण मोहीम तीव्र केली आहे. त्याचबरोबर लोकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या वैद्यकीय शिबिरांची संख्या वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button