Maharashtra Politics : विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘या’ तीन नेत्यांमध्ये चुरस | पुढारी

Maharashtra Politics : विरोधी पक्षनेतेपदासाठी 'या' तीन नेत्यांमध्ये चुरस

मुंबई : सोमवारपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या, रविवारी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित होणार आहे. त्यानंतर आघाडीकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊन विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, या पदासाठी काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात यांच्यात चुरस निर्माण झाली आहे

शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमदारांचा एक गट घेऊन पक्षाच्या बाहेर पडत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे विधानसभेत मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आई. तत्पूर्वी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेत्याचे नाव ठरणार आहे. काँग्रेसकडून या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्या नावांची चर्चा आहे. यापैकी विरोधी पक्षनेतेपदासाठी दोन माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच थोरात यांच्यात रस्सीखेच होणार असल्याचे समजते. मात्र, या पदासाठी कोणाची वर्णी लागणार, यावर दिल्लीतूनच शिक्कामोर्तब होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button