ममता बॅनर्जींचे ‘घूमजाव’, बंगळूरुमधील विरोधी पक्षांच्‍या बैठकीला उपस्‍थित राहणार | पुढारी

ममता बॅनर्जींचे 'घूमजाव', बंगळूरुमधील विरोधी पक्षांच्‍या बैठकीला उपस्‍थित राहणार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तृणमूल काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी १८ जुलै रोजी बंगळुरु येथे होणाऱ्या विरोधी पक्षाच्‍या बैठकीत उपस्थित राहणार आहेत, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

बंगळूर येथे होणार्‍या बैठकीला तृणमूलचे राष्‍ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जीहेही उपस्‍थित राहणार आहेत. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. आता त्‍यांनी या बैठकीला उपस्‍थित राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केल्‍याने विरोधी आघाडीला बळ मिळणार आहे.

सोनिया गांधी यांनी केला फोन….

पायाला दुखापत झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्‍थित राहणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते. मात्र काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्‍यांच्‍याशी फोनवर संवाद साधला. यानंतर ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्‍या बैठकीला येण्याचे मान्य केले आहे. विरोधी पक्षांची बैठक बंगळूर येथे १७ ते १८ जुलै रोजी होणार आहे.

बंगळूर येथे होणाऱ्या बैठकीत २४ विरोधी पक्ष सहभागी होऊ शकतात अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. यापूर्वी पाटणा येथे झालेल्या बैठकीत केवळ १५ विरोधी पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीला काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्‍थित राहण्‍याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button