चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणामागे आहे ‘या’ दोन नगरकरांचाही हातभार ! | पुढारी

चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणामागे आहे 'या' दोन नगरकरांचाही हातभार !

पुढारी ऑनलाईन : भारताच्या यशस्वी मोहिमांमध्ये आता चांद्रयान ३ मोहिमेचा आवर्जून समावेश करायलाच हवा. आज दुपारी २.३५ मिनिटांनी चंद्रयान ३ ने अवकाशात झेप घेतली. या उड्डाणासाठी सकाळपासून आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा हे केंद्र सज्ज झाले होते. देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञावर अभिनंदन होत आहे.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन भारताच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान अहमदनगरमध्ये  मात्र या यशस्वी उड्डाणाचा आनंद थोडा जास्तच खास होता. नगरचे दोन सुपुत्रही या मोहिमेचा भाग होते. राहाता तालुक्यातील राजुरी येथील असिफ महालदार यांच्या कंपनीकडे या मोहिमेच्या संरक्षणाची जबाबदारी होती तर वैज्ञानिक मयुरेश शेटे यांचाही या मोहिमेत यशस्वी सहभाग होता.

आमदार सत्यजित तांबे यांनी या संदर्भात ट्वीट करत या दोन्ही वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. सत्यजित आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “जगभराचे लक्ष वेधलेल्या आणि भारतासाठी ऐतिहासिक क्षण असलेल्या ‘चांद्रयान – ३’ मोहिमेत आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा सक्रिय सहभाग आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. राहाता तालुक्यातील राजुरी येथील असिफ महालदार यांच्या कंपनीकडे या मोहिमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, तर अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व इस्रोमध्ये कार्यरत वैज्ञानिक मयुरेश शेटे यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग आहे. आपल्या कामातून देशाचे नाव उंचावणाऱ्या या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन! ‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मनापासून शुभेच्छा!”

या उड्डाणानंतर आता उत्सुकता आहे ती लॅंडींगची. पुढील ४२ दिवस या यानाकडे इस्रोतील शास्त्रज्ञांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा : 

Chandrayan 3 : Chandrayan 3 : चांद्रयान तीनचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू; इस्रो प्रमुखांकडून आनंद व्यक्त

LIVE : Chandrayaan-3 : चांद्रयान- ३ अवकाशात झेपावलं, भारतासाठी ऐतिहासिक क्षण (Video)

Back to top button