पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे तिसरे चंद्र मिशन 'चांद्रयान-३' चे अवकाशात झेपावलं. अख्ख्या देशाचं लक्ष या मोहिमेकडे लागून राहिले होते. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून आज शुक्रवारी १४ जुलैला दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी 'चांद्रयान-३' अंतराळात प्रक्षेपित झालं. (Chandrayaan-3) भारतासाठी हा क्षण सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवला जाईल, असे उद्गार पीएम मोदी यांनी काढले.
या मोहिमेसाठी ६१५ कोटी रुपयांचे कोटींचे बजेट लागले आहे. हे मिशन जवळपास ५० दिवसांच्या यात्रेनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करेल. हे लॉन्चिंग श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड-२ येथून होईल. यास चंद्रावर पाठवण्यासाठी LVM-3 लॉन्चरचा वापर करण्यात येईल.