Swati maliwal: ‘पुरावे असूनही बृजभूषण यांना अद्याप अटक का नाही?’ – स्वाती मालीवाल | पुढारी

Swati maliwal: 'पुरावे असूनही बृजभूषण यांना अद्याप अटक का नाही?' - स्वाती मालीवाल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी बुधवारी (दि.१२ जुलै) रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष, भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना लक्ष्य केले. बृजभूषण सिंह याच्याविरोधी पुरावे असूनही अद्याप अटक का झाली नाही? असा सवाल दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलिस आणि केंद्राला विचारला आहे. याप्रकरणातील संशयित आरोपी बृजभूषण सिंग यांच्यावर अजूनही कारवाई न केल्याबद्दल मालीवाल यांनी केंद्र सरकारवर नाराजी दाखवली आहे. स्वाती यांनी यासंदर्भातील व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे.

मालीवाल यांनी ट्विटरवरील व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण देशाला माहित आहे की बृजभूषण सिंह हे एक मोठे राजकारणी आहेत. ज्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, भारतातील अव्वल कुस्तीपटू त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिनाभर रस्त्यावर बसले होते. ते ओरडत राहिले, ओरडत राहिले… दिल्ली पोलिसांना बृजभूषणला अटक करण्याची मागणी करत राहिले. पण त्याने काहीच झाले नाही. तर सरकारच्या दिरंगाईमुळे कुस्तीपटूंनाच लाजवले. (swati maliwal)

swati maliwal: केंद्र सरकारनेही अद्याप कारवाई का नाही केली?

दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल पुढे म्हणाल्या, आता दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात ठोस पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. यानंतर लैंगिक छळप्रकरणी बृजभूषण सिंह यांना कोर्टाचे समन्स देखील बजावले आहे. पण मला दिल्ली पोलिसांना विचारायचे आहे की, सिंह याला अद्याप अटक का केली नाही? केंद्र सरकारनेही त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा सवाल स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवरून व्हिडिओ शेअर करत केला आहे.

हेही वाचा:

Back to top button