Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण यांच्यावरील POCSO रद्दीकरण अहवालावर सुनावणी सुरू | पुढारी

Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण यांच्यावरील POCSO रद्दीकरण अहवालावर सुनावणी सुरू

पुढारी ऑनलाइन डेस्क : Brij Bhushan Sharan Singh : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने POCSO प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या रद्दीकरण अहवालावर सुनावणी सुरू केली. अल्पवयीन पैलवानाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पीडितेच्या वडिलांना 1 ऑगस्टसाठी नोटीस बजावली आहे. कोर्टाने POCSO प्रकरणात दिल्लीने दाखल केलेल्या रद्दीकरण अहवालावर विचार केला आणि त्यानंतर उत्तर मागितले.

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष, खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुरुवारी (दि. 15) दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. दोन वेगवेगळ्या न्यायालयांत पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले असून, यातील एका प्रकरणात मात्र पोलिसांनी सिंह यांना ‘क्लीन चिट’ दिल्याचे कळते. (Brij Bhushan Singh)

सहा महिला कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी राऊज एव्हेन्यू न्यायालयात एक हजार पानी आरोपपत्र दाखल केले. तर, अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पटियाला हाऊस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी पुरेसे पुरावे नसल्याकारणाने ‘पोक्सो’ गुन्हा रद्द करण्यासाठी अहवाल दाखल केला आहे. या रद्दीकरण अहवालावर आज 4 जुलैला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी सुरू करण्यात आली आहे. (Brij Bhushan Singh)

Brij Bhushan Sharan Singh : 7 महिला कुस्तीपटूंनी दिली होती लैंगिक शोषणाची तक्रार

7 महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी दिल्ली पोलिस दलात बृजभूषण यांच्याविरोधात लैंगिक शोषणची तक्रार दिली होती. तक्रारीनंतर 28 एप्रिल रोजी पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. 6 कुस्तीपटूंच्या तक्रारीच्या आधारे एक गुन्हा, तर 1 अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून ‘पोक्सो’ दाखल करण्यात आला होता.

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आयपीसी कलम 354, 354 डी, 345 ए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच ‘पोक्सो’ प्रकरणात कथित पीडिता आणि पीडितेच्या वडिलांच्या विधानाच्या आधारावर अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहितीदेखील दिल्ली पोलिस जनसंपर्क अधिकारी सुमन नलवा यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांना ‘पोक्सो’तून ‘क्लीन चिट’?

WFI Vs wrestlers: बृजभूषण सिंह यांच्याविरोधात१००० पानांचे आरोपपत्र दाखल; पोक्सो’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लीनचीट’?

Back to top button