Sita Dahal : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या पत्नीचे निधन

sita dahal
sita dahal
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या पत्नी सीता दहल यांचे बुधवारी वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. त्या दीर्घकाळ आजारी होत्या. त्यांना सकाळी ८ वाजता हृदयविकाराचा झटका आला. खूप (Sita Dahal ) प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. डॉक्टरांनी त्यांना ८ वाजून ३३ मिनिटांनी मृत घोषित केले. (Sita Dahal )

सीता दहल प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सीने पीडित होत्या. याशिवाय त्यांना पार्किंसन, डायबिटीज टाईप-२ आणि हायपरटेंशनचीदेखील तक्रार होती.

मीडिया रिपोर्टनुसार, मागील वषी्र ऑक्टोबरमध्ये प्रकृती बिघडल्यानंतर सीता दहल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी भारत आणि नेपाळमधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news