72 Hoorain : ’72 हूरें’ ची पहिल्याच दिवशी निराशाजनक कमाई | पुढारी

72 Hoorain : '72 हूरें' ची पहिल्याच दिवशी निराशाजनक कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक वादानंतर चित्रपट ७२ हूरें चित्रपट रिलीज झाला. (72 Hoorain ) चित्रपट रिलीज झाल्यानंतर फर्स्ट डे बॉक्स ऑफिस कलेक्शनदेखील समोर आले आहे. अशोक पंडितचा पहिल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे. (72 Hoorain)

७२ हूरें फर्स्ट डे कलेक्शन

अनेक वादानंतर निर्मात्यांनी ७२ हूरेंची रिलीज डेट टा‍ळली नाही. पण पहिल्या दिवशीचे कलेक्शन खूप निराशाजनक ठरले. चित्रपटाच्या कमाईच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

चित्रपटाने पहिल्या दिवशी एक कोटी रुपयांची कमाईदेखील केलेली नाही. रिपोर्टनुसार, ७२ हूरें चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ३५ लाखांचे कलेक्शन केले आहे. अद्याप वास्तविक आकडे समोर येणे बाकी आहेत.

चित्रपट रिलीज होण्यापूर्वी ७२ हूरेंचे सह-निर्माते अशोक पंडित यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सेन्सॉर बोर्डवर आरोप केले होते. अशोक पंडित यांचे म्हणणे होते की, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या ट्रेलरला सर्टिफिकेट देण्यासाठी नकार दिला आहे. तरीही निर्मात्यांनी डिजिटल ट्रेलर रिलीज केला होता.

चित्रपटामध्ये पवन मल्होत्रा, आमिर बशीर, सरू मैनी, राशिद नाज, अशोक पाठक आणि नम्रता दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शन संजय पूरन सिंह चौहान यांनी केलं आहे. अशोक पंडित चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. आता पाहावे लागेल की, ७२ हूरें चित्रपट येणाऱ्या दिवसात किती कमाई करतो.

Back to top button