Uttarkashi News : उत्तरकाशी- गंगोत्री महामार्गावर वाहनांवर दरड कोसळली; ४ भाविक ठार | पुढारी

Uttarkashi News : उत्तरकाशी- गंगोत्री महामार्गावर वाहनांवर दरड कोसळली; ४ भाविक ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरकाशी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गरम कुंड गंगनानीजवळ दरड कोसळली. या दुर्घटनेत एक टेम्पो ट्रॅव्हल्स आणि दोन छोटी वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यात ४ भाविकांचा मृत्यू तर ६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत एकच मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर इतरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एसडीआरएफने बचाव कार्य सुरू केले आहे.

गंगोत्रीहून उत्तरकाशीला यात्रेकरू परतत असताना ही घटना सोमवारी रात्री घडली. स्थानिक लोकांच्या मदतीने रात्री उशिरा काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवासी हे मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत.

रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत मोठमोठी दरड पडत असल्याने बचावकार्य थांबवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरकाशीमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली आहेत.

आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. कारमध्ये अद्याप एक मृतदेह अडकला आहे, तो काढण्यासाठी मदत कार्य सुरू आहेत. या दुर्घटनेतील सात जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले असून, इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. घटनास्थळी नायब तहसील भटवाडी/पोलीस चौकी प्रभारी भटवाडी/बीआरओ अधिकारी/एसडीआरएफ/पोलीस/रुग्णवाहिका इ. तैनात (Accident in Uttarkashi) आहेत.

ढिगाऱ्याखाली आलेल्या तीन वाहनांमध्ये एकूण 31 जण प्रवास करत होते. वाहनातील इतर सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. घटनास्थळावरून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकाचा मृतदेह वाहनात अडकला आहे. टेकडीवरून ढिगारा आणि खड्डे अधूनमधून येत असल्याने आणि मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी (Accident in Uttarkashi)  येत आहेत.

Uttarkashi News: सुमारे 11 तासांनंतर बचाव पथक घटनास्थळी

घटनास्थळी पोहचण्यास बचाव पथकाला अडचणी येत असल्याने सुमारे अकरा तासांनंतर म्हणजे मंगळवारी (दि.११ जून) सकाळी बचाव पथक घटनास्थळी पोहचले. यानंतर जखमींना गंगनानी येथे उपचार देऊन रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जवळपास 11 तासांनंतर एसडीआरएफसह इतर बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेतील मृत एक आणि इतर अन्य तीन पुरुष मध्य प्रदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button