Himachal Rain : हिमाचलमध्ये हाहाकार! मंडीमध्ये ढगफुटी, घर वाहून जातानाचा थरारक व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Himachal Rain : हिमाचलमध्ये हाहाकार! मंडीमध्ये ढगफुटी, घर वाहून जातानाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीसह उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पावसामुळे (Himachal Rain) हाहाकार उडाला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने आपत्कालिन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दरम्यान, हिमाचलमधून पुराचे थरारक व्हिडिओ समोर आले आहेत.

हिमाचलच्या (Himachal Rain) मंडी जिल्ह्यातून ढगफुटीच्या बातम्या येत आहेत. यासंबंधीचा एक भयानक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. कुल्लूमधील लघघाटी खोऱ्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. कुल्लूमधील थुनागमध्ये ढगफुटी झाली असून समोर आलेला व्हिडिओ भयावह आहे. मोठा पाण्याचा लोट येत असल्याचे दिसत आहे. यात लाकडे, एक घर वाहून जात असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. लोक शिट्ट्या वाजवताना आणि ओरडताना दिसत आहेत.

याआधीही हिमाचल प्रदेशातून मुसळधार पावसाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यापूर्वी, मणिकर्णातून एक भयानक दृश्य समोर आले होते. ज्यामध्ये पाण्याची पातळी खूप जास्त आहे. आणि तीव्र पूर आला आहे. कल्व्हर्टवरही पाणी येत असल्याची परिस्थिती आहे. हा व्हिडीओ खूप भीतीदायक होता. यापूर्वी घर कोसळल्याने दाम्पत्य आणि मुलाचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली होती. रविवारी पहाटे ग्रॅम्फू गाव आणि छोटा धरा येथे भूस्खलन झाले. या घटनेत दाम्पत्य आणि मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ग्रामपू ते छोटा धरा या दरम्यान विविध मार्गावरही रस्ता बंद झाल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button