Rainfall forecast | कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! IMD ची माहिती | पुढारी

Rainfall forecast | कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईल : मुंबईत मान्सून सक्रीय झाल्यानंतर आठवडाभरातच जूनच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, महाराष्ट्रातील कोकण, केरळ आणि कर्नाटकला पावसाने चांगेलच झोडपले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा आयएमडीने जारी केलेल्या बुलेटिननुसार, १३ ते १४ जुलैपासून कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे, असे आयएमडी पुणेचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.

काहीशा विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पावसाला जोरदार सुरूवात होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील १३-१४ जुलैपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात होईल; असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

पुढील 3 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील घाट भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच पश्चिम भारतातील राज्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता (Weather Forecast) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button