

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीध्ये फूट फडल्यानंतर आता बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष जनता दल संयुक्त ( जेडीयू )मध्ये पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्यावर 'एबीपी-सी व्होटर'ने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा भाजपशी हातमिळवणी करू शकतात का, असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. होय, नाही आणि माहित नाही असे उत्तर होते . 'एबीपी-सी व्होटर'च्या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ३४ टक्के लोकांनी म्हटलं आहे की, नितीश कुमार पुन्हा भाजपशी हातमिळवणी करू शकतात. तर ४८ टक्के लोकांचा हे अशक्य असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूची युती कायम राहील, असे त्यांना वाटते. १८ टक्के लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. या सर्वेक्षणात २५७५ लोकांनी भाग घेतला होता.
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी जेडीयू आणि नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरही सर्वेक्षण करण्यात आले. लोकांना विचारण्यात आले की, मांझी यांनी जेडीयू मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला आहे. नितीशकुमार यांच्यासोबत केवळ ४-५ आमदार राहतील असे म्हटलेआहे. तुम्ही त्याच्या दाव्याशी सहमत आहात का? या सर्वेक्षणाच्या निकालानुसार ३८ टक्के लोकांनी मांझी यांच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर ५१ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, नितीश कुमार यांचा पक्ष तुटणार नाही. ११ टक्के लोकांकडे यावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
हेही वाचा :