Aircraft crashed: अमेरिकेत विमान दुर्घटना; विमान जळून खाक, सहा जणांचा मृत्यू | पुढारी

Aircraft crashed: अमेरिकेत विमान दुर्घटना; विमान जळून खाक, सहा जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन: अमेरिकेतील लॉस एंजेलिस विमानतळाजवळ शनिवारी (दि.०९ जून) भीषण विमान दुर्घटना घडली. विमानतळाजवळील एका शेतात  विमान क्रॅश झाले. अपघातानंतर विमान पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.  हे खासगी विमान व्हेगासमधून कॅलिफॉर्नियाकडे जात असताना, ही दुर्घटना घडली असल्याची माहिती स्थानिक फेडरल अधिकाऱ्यांनी दिली आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे.

सेस्ना C550 हे एक बिझनेस जेट विमान लास व्हेगासहून जात होते. लॉस एंजेलिसच्या दक्षिणेस सुमारे137 किमी अंतरावर (85 मैल) रिव्हरसाइड काउंटीमधील फ्रेंच व्हॅली विमानतळाजवळ ते कोसळले. यामध्ये सहा विमान प्रवाशांचा मृत्‍यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे, असे फेडरल एव्हिएशन प्रशासनाने एका निवेदनात म्हटले आहे.

चार जुलै रोजी, याच विमानतळाजवळ आणखी एक विमान अपघात दुर्घटना घडली होती. चार प्रवासी असलेले एक छोटे विमान क्रॅश झाले होते. यामध्ये पायलटचा मृत्यू झाला आणि तीन अल्पवयीन जखमी झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button