फाळणीने वेगळे केले…’ते’ ७५ वर्षांनी भेटलेही! पण, नियतीच्‍या मनात वेगळंच होतं…

पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे सादिक आणि सिक्‍का यांची  १० जानेवारी २०२२ रोजी भेट झाली हाेती..
पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे सादिक आणि सिक्‍का यांची  १० जानेवारी २०२२ रोजी भेट झाली हाेती..
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आकस्‍मिक घटना घडतात तेव्‍हा सारेच जण  नियतीच्‍या मनात नेमकं काय असतं कोणालाही सांगता येत नाही, असे बोलून जातात. कारण या घटनाच अशा असता की क्षणात सारं काही गवसल्‍याचा आनंद मिळतो तर क्षणात सारं काही उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍याची दु:ख पदरी पडते. असाच काहीचा अनुभव भारताच्‍या फाळणीवेळी ताटातूट झालेल्‍या सख्‍ख्‍या भावांना आला आहे. त्‍यांची तब्‍बल ७५ वर्षांनंतर झालेली भेट औटघटकेची ठरली आहे. ( Divided by Partition )

Divided by Partition : फाळणीत कुटूंब उद्‍धवस्‍त, खख्‍या भावांची ताटातूट

भारताची फाळणी झाली तेव्‍हा हजारो कुटुंब उद्‍ध्‍वस्‍त झाली. रक्‍ताच्‍या नात्‍याची कायमस्‍वरुपी ताटातूटही झाली.सादिक खान आणि त्‍यांचा धाकटा भाऊ सिक्का खान यांच्‍याबाबतही असेच झाले. फाळणी झाली त्‍यावेळी सादिक हा आपल्‍या वडिलांसह पाकिस्‍तानमधील फैसलाबाद येथील बोग्रान गावात होता. तर त्‍याची आई आणि लहान भाऊ सिक्‍का आणि बहिण हे आईच्‍या माहेर असणार्‍या पंजाबमधील भटिंडा जिल्‍ह्यातील फुलेवाल गावात होते. फाळणी झाली आणि दोन देशांमधील सीमांनी या दोन भावांची कायमस्‍वरुपी ताटातूट केली. पुढे सादिक यांच्‍या वडिलांचा दंगलीत मृत्‍यू झाला. यानंतर तो फैसलाबादमधील बोग्रान गावात काकांची घरी होत राहिला. त्‍याचा विवाह झाला. त्‍याला मुले आणि नातवंडेही आहेत, सादिक याची ही स्‍टोरी पाकिस्‍तानमधील यूट्‍यूबर नासिर ढिल्लन याने २०१९ मध्‍ये एका व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून अपलोड केली होती.

तब्‍बल ७५ वर्षांनंतर भावांची भेट

भंटिडा येथे राहिलेला सिक्‍काच्‍या आईने आत्‍महात्‍या केली. फाळणीनंतर काही वर्षांनी त्‍यांची बहिणीचाही मृत्‍यू झाला. सिक्‍का हे अविवाहित राहिले. यूट्‍यूबर नासिर ढिल्लन यांच्‍या व्‍हिडिओमुळे दोन्‍ही भावांच्‍या ताटातूट झाल्‍याची काहाणी सर्वांसमोर आली. मात्र त्‍याच काळात कोरोना महामारी सुरु झाली. भावाला भेटण्‍यासाठी सिक्‍का यांना दोन वर्ष आणखी वाट पावी लागली. मागील वर्षी १० जानेवारी रोजी पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे दोन्‍ही भावांची तब्‍बल ७५ वर्षांनंतर भेट झाली. आंतरराष्‍ट्रीय पातळीवर या भेटीची दखल घेतली होती. या दोघांचा फोटो भारतातून पाकिस्तान वेगळे झाल्यावर विभक्त झालेल्या पूर्व आणि पश्चिम पंजाबमधील कुटुंबांच्या अशा अनेक पुनर्मिलनांचे प्रतीकापैकी एक ठरला होता.

नियतीच्‍या मनात वेळंच होतं…

सादिक खान यांनी भारतीय पंजाबमधील अमृतसर आपला भाऊ सिक्का खान यांना व्हिडिओ कॉल केला. यावेळी त्याचे कुटुंब जूनमध्ये लग्नाच्या तयारीत होते. आम्ही व्हिडिओ कॉलवर होतो. तो फिट दिसत होता. मी त्याला भारतात येण्यास सांगितले. त्याने मला उन्हाळा संपण्याची वाट पाहण्यास सांगितले होते. मला कल्पना नव्हती की, हा आमचा शेवटचा कॉल असेल. पण, नियतीच्‍या मनात वेगळेच होते. ४ जुलै रोजी सादिक यांचा आकस्‍मिक मृत्‍यू झाला, असे सिक्का खान यांनी सांगितले.

Divided by Partition : आता मात्र कायमस्‍वरुपी ताटातूट ….

तब्‍बल ७५ वर्षांनंतर भेटलेल्‍या भावांची केवळ दीड वर्षांमध्‍ये नियतीने पुन्‍हा ताटातूट केली . यापूर्वी देशांच्‍या फाळणीवेळी एका नकाशावरील रेखाटलेल्‍या रेषेमुळे दोघे वेगळे झाले होते. मात्र तब्‍बल ७५ वर्षांनी भेटले. मात्र ही भेट औटघटकेचीच ठरली. दोघांपैकी एका भावाचा मृत्‍यूमुळे झाल्‍याने नियतीही या दोघांमधील कायमस्‍वरुपीची ताटातूट केली आहे. पुन्‍हा एकदा आमच्‍यामध्‍ये दोन देशांच्‍या सीमा आल्‍या. मी त्‍याच्‍या अंत्‍यसंस्‍कारालाही उपस्‍थित राहू शकलो नाही, अशी खंतही सिक्‍का व्‍यक्‍त करत आहेत.

पुढील आयुष्यातही आपण भाऊ असू….

सिक्का खान गेल्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानला गेले होते. काही काळ आपल्‍या भावासोबत राहिले होते. सिक्कासोबत राहण्यासाठी सादिक खानही जूनमध्ये भारतात येणार होते;पण त्‍यापूर्वीच त्‍यांना मृत्‍यूने गाठले. मी देवाचा आभारी आहे की त्याने आपल्याला या आयुष्यात भावाला भेटू दिली. मला आशा आहे की, पुढील आयुष्यातही आपण भाऊ असू," हे सांगताना सिक्का यांना आपल्‍या अश्रूचा बांध आवरता आला नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news