Railway Fare | प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वेच्या प्रवासी भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात | पुढारी

Railway Fare | प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वेच्या प्रवासी भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात

पुढारी ऑनलाईन :  रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. एसी चेअर, वंदे भारतसह सर्व रेल्वे गाड्यांचे एक्झिक्युटिव्ह क्लासेसचे भाडे २५ टक्क्यांपर्यंत कमी केले जाईल, अशी घोषणा रेल्वे बोर्डाने शनिवारी केली. गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी संख्या होती त्या रेल्वेतील सवलतीच्या भाडे योजनेच्या निर्णयाचा हा भाग असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. (Railway Fare)

रेल्वेमधील आराम सुविधांचा वापर करण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, एसी प्रवास सुविधा असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची योजना लागू करण्याचे अधिकार विभागीय रेल्वेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे योजना?

  • रेल्वे मंत्रालयाने सांगितले की २५ टक्क्यांपर्यंत सूट मूळ भाड्यावर लागू केली जाईल. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार (Super fast surcharge), जीएसटी आदी इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील.
  • गेल्या ३० दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी संख्या असलेली रेल्वेगाडी या भाडे सवलतीसाठी विचारात घेतली जाणार आहे. ही सवलत त्वरित प्रभावाने लागू केली जाईल.
  • आधीच बुकिंग केलेल्या प्रवाशांना भाडे परतावा दिला जाणार नाही.
  • ज्या गाड्यांमध्ये डे योजना विशिष्ट क्लाससाठी लागू आहे आणि ज्यात प्रवासी संख्या कमी आहे अशा गाड्यांमध्ये भाडे योजना प्रवासी संख्या वाढवण्याचा उपाय म्हणून मागे घेतली जाऊ शकते.
  • अशा गाड्यांमध्ये निश्चित कालावधीसाठी तत्काल कोटा निश्चित केला जाणार नाही. जर रेल्वेच्या काही भागाच्या प्रवासासाठी सवलत दिली गेली असेल, त्या भागासाठी तत्काल कोटा प्रदान केला जाऊ शकत नाही.
  • ही सवलत पहिला चार्ट तयार होईपर्यंत आणि सध्याच्या बुकिंग दरम्यान बुक केलेल्या तिकिटांवर लागू केली जाऊ शकते. TTE द्वारे सवलतीसाठी ऑनबोर्डदेखील परवानगी दिली जाऊ शकते. (Railway Fare)

हे ही वाचा :

Back to top button