

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मु-काश्मीरमधील राजौरी येथील थानामंडी परिसरात कारला झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर पाचजण जखमी झाले आहेत. जखमींवर राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सहयोगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंबंधी वैद्यकीय अधीक्षक, डॉ. मेहमूद हुसेन बाजार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. (J&K Accident)
माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. राजौरीतील थानामंडी परिसरात हा अपघात झाला आहे. आठदिवसांपुर्वी जम्मू आणि काश्मीरमधील डोडा आणि रामबन जिल्ह्यांमध्ये तीन वाहने खोल दरीत कोसळल्याने आठ जण ठार आणि १७ जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा