Hyderabad Car Accident : मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन महिलांसह एका मुलाला भरधाव कारने चिरडले; पाहा व्हिडिओ | पुढारी

Hyderabad Car Accident : मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन महिलांसह एका मुलाला भरधाव कारने चिरडले; पाहा व्हिडिओ

पुढारी ऑनलाइन डेस्क : हैदराबाद येथे एका भरधाव अनियंत्रित कारने मॉर्निंग वॉकला निघालेल्या दोन महिला आणि एका मुलाला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये तिघेही अक्षरशः वाईट पद्धतीने चिरडले गेले. ही घटना आज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी घडली. याचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ आउट झाला आहे. घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. Hyderabad Car Accident

तेलंगणातील हैदराबादमधील हैदरशाकोट मेन रोडवर एका अनियंत्रित भरधाव कारने तिघांना चिरडल्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. ही कार प्रचंड वेगाने येत असल्याचे दिसत आहे. सकाळी मॉर्निंगवॉकसाठी निघालेल्या दोन महिला आणि एक मुलगा रस्त्याच्या कडेने जात होते.

यावेळी लाल रंगाच्या कारने भरधाव येऊन तिघांना जोरदार धडक दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे पहिले कार अनियंत्रित झाली. ती प्रचंड वेगात होती. कारने ब्रेक लावला मात्र प्रचंड वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. ती पहिले फुटपाथला धडकते. नंतर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या या तिघांनाही जबरदस्त धडक देते. त्यानंतर पुढे झाडीमध्ये घुसते. Hyderabad Car Accident

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आई-मुलासह दुसऱ्या महिलेचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कारची झडती घेतली. मृतांची ओळख अजून पटली नाही.

हे ही वाचा :

Dhule accident news: पळासनेरजवळ भीषण अपघातात ९ ठार; ३० जण जखमी

Dhule accident news: पळासनेर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

Back to top button