ओडिशातील भीषण रेल्‍वे अपघात मानवी चुकीमुळेच : ‘सीआरएस’चा अहवाल | पुढारी

ओडिशातील भीषण रेल्‍वे अपघात मानवी चुकीमुळेच : 'सीआरएस'चा अहवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  ओडिशा येथे झालेल्‍या भीषण रेल्‍वे अपघात हा मानवी चुका आणि चुकीच्‍या सिग्‍नलिंगमुळेच झाला , असे कमिशन ऑफ रेल्‍वे सेफ्‍टीने ( सीआरएस) रेल्‍वे बोर्डाला सादर केलेल्‍या स्‍वतंत्र चौकशी अहवालात म्‍हटले असल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. २ जून रोजी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या अपघातात २९२ लोकांचा मृत्यू झाला होता तर एक हजारहून अधिक लोक जखमी झाले होते.

….जुन्‍या काळाप्रमाणे लाल झेंडे दाखवले असते तरी दुर्घटना टाळता आली असती

मानवी चुका आणि चुकीचे सिग्नलिंगमुळे बालासोर येथील भीषण रेल्‍वे अपघात झाला. रेल्वे अपघाताचे प्रमुख कारण उच्चस्तरीय चौकशीत आढळून आले आहे. सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन (S&T) विभागात एकाधिक स्तरावरील त्रुटी यामध्‍ये दर्शवल्या आहे. भूतकाळातील लाल झेंडे दाखवले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वेळेच उपाययोजना केल्‍या असत्‍या तर…

कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टी (CRS) ने सादर केलेल्या स्वतंत्र चौकशी अहवालात म्हटले आहे की, फील्ड पर्यवेक्षकांच्या टीमने वायरिंग डायग्राममध्ये बदल केला. १६ मे २०२२ रोजी दक्षिण-पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागातील बंकरनायबाज स्टेशनवर चुकीची वायरिंग आणि केबल बिघाडामुळे अशीच एक घटना घडली होती. या घटनेनंतर, चुकीच्या वायरिंगच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि सुधारात्मक उपाययोजना झाल्‍या असत्‍या तर बालासोर येथे भीषण अपघात घडला नसता, असेही या अहवालात नमूद करण्‍यात आला आहे. सिग्नलिंग वायरिंग डायग्राम, इतर कागदपत्रे आणि सिग्नलिंग सर्किट्सचे अद्ययावत करण्यासाठी मोहीम सुरू करावी, अशी शिफारस सीआरएसने आपल्‍या अहवालात केली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button