BJP state president : भाजपमध्ये मोठा फेरबदल; ‘या’ राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलले | पुढारी

BJP state president : भाजपमध्ये मोठा फेरबदल; 'या' राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलले

पुढारी ऑनलाईन: भाजपमध्‍ये राज्यनिहाय नेतृत्वात आज मोठा फेरबदल करण्यात आला. तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड आणि पंजाबचे भाजप प्रदेशाध्यक्षपदी नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती (BJP state president) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून दिली असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

पुढील वर्षाच्या मध्यात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनात्मक बदलांना सुरुवात केली असून चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष पक्षाने बदलले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सुनील जाखड यांच्याकडे पंजाबची तर माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्याकडे झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश भाजप अध्यक्षपदी पी. पुरंदेश्वरी यांना नेमण्यात असून चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणाऱ्या तेलंगणची जबाबदारी जी. किशन रेड्डी यांच्याकडे देण्यात आली आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र एटीला यांची वर्णी लागली आहे. पंजाब प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी याआधी अश्विनी शर्मा यांच्याकडे होती.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील जाखड यांना गुरुदासपूर मतदारसंघातून तिकीट दिले जाण्याचीही शक्यता आहे. जाखड यांनी याआधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तेलंगणमध्ये संजय बंडी यांच्याजागी जी. किशन रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे. तर झारखंडमध्ये दीपक प्रकाश यांच्याजागी मरांडी यांना संधी देण्यात आली आहे. आंध्रमध्ये सोमू वीरराजू यांच्याजागी पुरंदेश्वरी यांना नेमण्यात आले आहे, अशी माहिती (BJP state president) भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी यांनी भाजपच्या अधिकृत ट्विटरवरून  दिली आहे.

Image

Image

Image

हेही वाचा:

Back to top button