Stock Market Closing | शेअर बाजाराचा पुन्हा विक्रमी उच्चांक! सेन्सेक्स ६५,४७९ वर बंद | पुढारी

Stock Market Closing | शेअर बाजाराचा पुन्हा विक्रमी उच्चांक! सेन्सेक्स ६५,४७९ वर बंद

पुढारी ऑनलाईन : वाढत्या परदेशी गुंतवणुकीच्या जोरावर आज मंगळवारी (दि.४) शेअर बाजाराची पाचव्या सत्रांत विक्रमी उच्चांकाची झेप कायम राहिली. आजच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने ६५,६०० चा टप्पा पार केला. तर निफ्टी १९,४०० च्या वर पोहोचला. आज बाजारात चौफेर खरेदी दिसून आली. या तेजीत फायनान्सियल, बँकिंग आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर राहिले. त्यानंतर सेन्सेक्स २७४ अंकांच्या वाढीसह ६५,४७९ वर बंद झाला. तर निफ्टी ६६ अंकांनी वाढून १९,३८९ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह हे निफ्टी ५० वर सर्वाधिक वाढले तर आयशर मोटर्स शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. आयशर मोटर्सचा शेअर ६ टक्क्यांनी घसरून ३,४०८ रुपयांपर्यंत खाली आला. क्षेत्रीयमध्ये पीएसयू बँकांनी दमदार कामगिरी केली तर एनर्जी, इन्फ्रा आणि एफएमसीजीवर दबाव राहिला.

काल सोमवारी सेन्सेक्स ४८६ अंकांच्या वाढीसह ६५,२०५ वर बंद झाला होता. आज मंगळवारी तो ६५,५०३ वर खुला झाला. तर आज त्याने ६५,६७२ अंकांपर्यंत झेप घेतली. बँक निफ्टी पहिल्यांदाच ४५,४०० च्या जवळ पोहोचला. बँक निफ्टीतील १२ पैकी ८ शेअर्समध्ये तेजी राहिली. (Stock Market Closing)

‘हे’ ठरले टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, एनटीपीसी, टायटन, टीसीएस, एसबीआय, एचडीएफसी, एचडीएफसी बँक हे शेअर्स वाढले. विप्रो, सन फार्मा, कोटक बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस या शेअर्सनीही आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर भारती एअरटेल, रिलायन्स, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.

बजाज फायनान्सची दमदार कामगिरी

जून २०२३ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ३२ टक्के वाढून २.७ लाख कोटींवर गेल्यानंतर बजाज फायनान्सचे शेअर्स (Shares of Bajaj Finance) आजच्या ट्रेडिंगमध्ये ७ टक्क्यांनी वाढले. पहिल्या तिमाहीत AUM मधील सुमारे २२,७०० कोटी रुपयांची वाढ ही आतापर्यंतची तिमाहीतील सर्वाधिक वाढ आहे. बजाज फायनान्सचा शेअर ७ टक्के वाढून ७,९०० रुपयांवर पोहोचला.

हिरो मोटोकॉर्पचा शेअर वधारला, जाणून घ्या कारण

अमेरिकन मोटरसायकल निर्माता कंपनी Harley-Davidson ने त्यांची सह-विकसित प्रीमियम मोटरसायकल हार्ले डेव्हिडसन X440 (Harley-Davidson X440) भारतात लाँच केल्यानंतर हिरो मोटोकॉर्पचा (Hero MotoCorp shares) शेअर BSE वर मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये ३ टक्के वाढून २,९८१ रुपयांवर गेला. Harley-Davidson X440 ही दोन ब्रँडमधील परवाना करारांतर्गत लाँच केलेली पहिली प्रीमियम मोटरसायकल ठरली आहे.

IDFC फर्स्ट बँकेचा शेअर गडगडला

एचडीएफसी बँक एचडीएफसी विलीनीकरणानंतर आता आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank)- आयडीएफसी (IDFC) विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. IDFC फर्स्ट बँक आणि IDFC च्या संचालक मंडळांनी रिव्हर्स विलीनीकरणाला नुकतीच मान्यता दिली. दरम्यान, या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर, मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये IDFC फर्स्ट बँकेचा शेअर ६ टक्क्यांपर्यंत घसरून दिवसाच्या निचांकी ७७.१० रुपयांवर आला. तर आयडीएफसी (IDFC) चा शेअर ६ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Closing)

परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ कायम

NSE डेटानुसार, सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निव्वळ आधारावर १,९९६ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी ३३८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

आशियाई बाजारातील स्थिती

मंगळवारी बहुतांश आशियाई बाजारात घसरण दिसून आली. दरम्यान, गुंतवणूकदारांचे मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर वाढीच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका डॉलर आणि कच्च्या तेलाचे दर स्थिर पातळीवर आहेत. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक मंगळवारी सकाळी ०.१ टक्के खाली होता. तर ऑस्ट्रेलियन शेअर्स बहुतेक सपाट झाले. जपानचा निक्केई निर्देशांक सरासरी ०.९८ टक्क्यांनी घसरून ३३,४२२ वर बंद झाला.

 हे ही वाचा :

Back to top button