याचिकाकर्ता महिला आहे हे जामीन मंजुरीचे कारण ठरत नाही : कर्नाटक उच्‍च न्‍यायालय | पुढारी

याचिकाकर्ता महिला आहे हे जामीन मंजुरीचे कारण ठरत नाही : कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : याचिकाकर्ता महिला आहे हे जामीन मंजुरीचे कारण ठरत नाही, असे स्‍पष्‍ट करत पतीच्‍या खून प्रकरणी अटकेत असलेल्‍या माहिलेचा जामीन अर्ज कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला.

काय होते प्रकरण?

याचिकाकर्ता महिला आणि तिचा प्रियकर (सहआरोपी) या दोघांनी अनैतिक संबंध हाेते. याला संबंधांना महिलेच्‍या पतीने विराेध केला. दाेघांनी पतीच्या हत्येचा कट रचला. पती घरी झोपला असताना पत्‍नीने त्याच्यावर चाकूने वार केले. यानंतर घरावर दरोडा पडला होता, असे भासविण्‍यासाठी त्याच चाकूने स्वतःलाही जखमी केले होते.

पोलीस तपासात पत्‍नी आणि तिच्‍या प्रियकरानेच पतीचा खून केल्‍याचे उघड झाले. भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत खून, गुन्हेगारी कट रचणे आदी कलमान्‍वये महिलेसह तिच्‍या प्रियकरावर  गुन्‍हा दाखल झाला होता. सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये महिला आरोपी आणि तिच्‍या प्रियकराला अटक करण्‍यात आली होती. तुरुंगात शिक्षा भोगत असलेली महिलेने जामिनासाठी कर्नाटक उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली हाेती.

केवळ महिला आहे हे जामीन मंजुरीचे कारण ठरत नाही

न्‍यायमूर्ती मोहम्‍मद नवाज यांच्‍या एकल खंडपीठासमोर महिलेने दाखल केलेल्‍या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वकिलांच्या जामीनासाठी केलेल्या विनंतीला उत्तर देताना न्‍यायमूर्ती नवाज यांनी स्‍पष्‍ट केले की, “या टप्प्यावर, याचिकाकर्त्याविरुद्ध प्रथमदर्शनी खटला सुरू आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. केवळ याचिकाकर्ता महिला आहे हे जामीन मंजुरीचे कारण ठरत नाही, हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या सहआरोपीला जामीन मंजूर केल्यानेही याचिकाकर्त्याच्या खटल्‍याला काही फायदा होणार नाही, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. आरोपी महिलेच्या मुलाने वडिलांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री आई-वडिलांमध्ये भांडण झाल्याचे विधानही जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने विचारात घेतले.

हेही वाचा : 

 

Back to top button