LPG Cylinder Price | महागाईचा चटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ | पुढारी

LPG Cylinder Price | महागाईचा चटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ

पुढारी ऑनलाईन : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ७ रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत १,७७३ रुपयांवरून १,७८० रुपयांवर गेली आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (LPG Cylinder Price)

तेल विपणन कंपन्यांनी (oil marketing companies) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात (Commercial gas cylinder prices) १ जून २०२३ रोजी ८३.५ रुपयांची कपात केली होती. तर १ मे २०२३ रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात १७२ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता दरात वाढ करण्यात आली आहे. (LPG cylinder prices today)

१ मे २०२३ रोजी घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत १,१०३ रुपये होती. या दरात कोणताही बदल केलेला नाही. पण १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता १,७८० रुपये झाली आहे.

व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी अशा दोन्ही सिलिंडरच्या दरात प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बदल केला जातो. (LPG cylinder prices today) गेल्या चार महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून ग्राहकांना दिलासा दिला जात होता. मात्र आजपासून दरात किरकोळ वाढ झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button