नागपूर, पुढारी वृत्तसेवा: दररोजच्या जेवणात वापरला जाणाऱ्या टोमॅटोने प्रति किलो शंभरी गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोची चव चाखणे कठीण झाले आहे. टोमॅटो १०० ते १२० रु किलोने विकला जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. (Nagpur)
घ्यायचा काय भाव आणि विकायचा कितीला ?
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात टोमॅटो गाड्यांची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. महात्मा फुले, कॉटन मार्केटमध्ये देखील चढ्या दराने टाेमॅटाे विकले जात असल्याने किरकोळ विक्रेत्यांना टोमॅटो घ्यायचा काय भाव आणि विकायचा कितीला? असा प्रश्न पडला आहे.
अद्रक, लसूण, कोथिंबीर देखील बरीच महागली आहे. सर्वसामान्य नागरिक टोमॅटो खरेदी करण्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. मालाची आवक कमी आणि लग्नसराई जोरात असताना टोमॅटोचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी, किरकोळ विक्रेत्यांनी व्यक्त केली.