तीर्थयात्रा योजना: दिल्लीतील वरिष्ठ नागरिकांना मोफत अयोध्या यात्रा! | पुढारी

तीर्थयात्रा योजना: दिल्लीतील वरिष्ठ नागरिकांना मोफत अयोध्या यात्रा!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : तीर्थयात्रा योजना : दिल्ली सरकारकडून राबविल्या जाणार्‍या तीर्थयात्रा योजनेत अयोध्या यात्रेचा समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे आगामी काळात दिल्लीतील वरिष्ठ नागरिकांना मोफत अयोध्या यात्रा करण्याची संधी मिळणार आहे. तीर्थयात्रा योजनेचा लाभ 35 हजार वरिष्ठ नागरिकांनी घेतलेला आहे.

दिल्ली सरकारकडून वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना राबविली जाते. योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना जगन्नाथपुरी, शिर्डी, अमृतसर, जयपूर, जम्मू, द्वारका, तिरुपती, रामेश्वरम, हरिद्वार, मथुरा आणि बोधगया या ठिकाणी तीर्थयात्रा घडवून आणली जाते. अलिकडेच केजरीवाल यांनी अयोध्या यात्रा केली होती. त्यानंतर दिल्लीत येऊन त्यांनी तीर्थयात्रा योजनेत अयोध्येचा समावेश केला जात असल्याचा निर्णय घेतला आहे.

तीर्थयात्रा योजनअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना वातानुकूलीत श्रेणीचे रेल्वेचे तिकीट इच्छित तीर्थस्थळाला जाण्या-येण्यासाठी दिले जाते. याशिवाय त्या-त्या ठिकाणचा स्थानिक प्रवास खर्चही दिला जातो. दरम्यान भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली असून रामजन्मभूमी स्थळावर जाऊन केजरीवाल त्यांचे पाप धुवत असल्याचे म्हटले आहे.

Back to top button