कर्नाटकात 'अण्णा भाग्य' योजनेंतर्गत १० जुलैपासून पैसे वाटप : मुख्‍यमंत्री सिद्धरामय्या | पुढारी

कर्नाटकात 'अण्णा भाग्य' योजनेंतर्गत १० जुलैपासून पैसे वाटप : मुख्‍यमंत्री सिद्धरामय्या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटक  सरकारकडून अन्नभाग्य योजना  ( Anna Bhagya Scheme ) राबविण्यात येणार आहे. आम्‍ही १० जुलैपासून या योजनेंतर्गत मोफत तांदळाच्या बदल्यात पैसे वाटण्यास सुरुवात करणार आहोत, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज दिली.

राज्य सरकारकडून अन्नभाग्य योजना राबविण्यात येणार असून, आता 10 किलोमध्ये प्रति व्यक्ती निम्मे तांदूळ, तर निम्म्या तांदळाचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाच किलो तांदूळ व पाच किलो तांदळाचे प्रती किलो 34 रु. दराने प्रतिमहिना 170 रुपये प्रत्येक व्यक्तीला देण्यात येणार आहेत. योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार असल्याचे यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्‍पष्‍ट केले होते.

राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत अन्नभाग्य योजनेबाबत चर्चा झाली होती. केंद्र सरकारनेने तांदूळ देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर निम्मा तांदूळ पुरवण्याबरोबरच निम्म्या तांदळाचे पैसे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. लाभार्थ्याच्या बँक खात्यात हे पैसे थेट जमा करण्यात येणार असल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले होते.

2 लाख 29 हजार टन आवश्यक

राज्यातील बीपीएल आणि एपीएल शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारकडून तांदूळ पुरवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला 2 लाख 29 हजार टन तांदळाची आवश्यकता आहे. इतक्या प्रमाणात तांदळाचा पुरवठा करण्याची कोणत्याही राज्याची क्षमता नाही. बाजारात तांदळाचे दरही वाढल्याने अडचण निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button