Small Savaing Scheme Interest : अल्पबचत व्याजदरात केंद्राने केली वाढ; आजपासूनच अंमलबजावणी | पुढारी

Small Savaing Scheme Interest : अल्पबचत व्याजदरात केंद्राने केली वाढ; आजपासूनच अंमलबजावणी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था; केंद्र सरकारने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी निवडक अल्पबचत योजनांवरील व्याजदरात ०.३ टक्क्याने वाढ केली. केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी त्यासंदर्भात परिपत्रक जारी केले. उद्या, १ जुलैपासून नवीन व्याजदरवाढ लागू होणार आहे. Savaing Scheme Interest

पाच वर्षापर्यंतच्या आवर्ती ठेवींवर (आर.डी.) ०.३ टक्क्यांची व्याजदरवाढ मिळणार आहे. या निर्णयामुळे आरडी ठेवीदारांना ६.२ टक्क्यांऐवजी ६.५ टक्के व्याज दर मिळणार आहे. टपाल खात्यातील १ वर्ष मुदतीपर्यंतच्या ठेवींवर ६.९ टक्के व्याजदर मिळेल. ३ ते ५ वर्षातील मुदत ठेवीवर अनुक्रमे ७ आणि ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावरील व्याज दर मात्र जैसे थे (७.१ टक्के) ठेवण्यात आला आहे. सुकन्या समृद्धी (८ टक्के) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील ( ७.७ टक्के) व्याजदर मात्र जैसे थे आहेत.

हे ही वाचा :

HDFC-HDFC Bank merger | ‘एचडीएफसी’च्या भागधारकांची चांदी, २५ शेअरच्या बदल्यात मिळणार ४२ शेअर

 

Back to top button