Kaushambi encounter | यूपी पोलिसांच्या STF ची मोठी कारवाई, वॉन्टेड गुन्हेगार एन्काउंटरमध्ये ठार | पुढारी

Kaushambi encounter | यूपी पोलिसांच्या STF ची मोठी कारवाई, वॉन्टेड गुन्हेगार एन्काउंटरमध्ये ठार

प्रयागराज : पुढारी ऑनलाईन; उत्तर प्रदेशात गुन्हेगारांना पकडण्यासाठी कारवाई सुरुच आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) मंगळवारी मोठी कारवाई केली. या पथकाने वॉन्टेड गुन्हेगार मोहम्मद गुफरान याला एन्काउंटरमध्ये ठार केले. गुफरान हा प्रतापगढ जिल्ह्यातील आझाद नगर येथील रहिवासी आहे. त्याच्यावर सुमारे २ डझन गुन्हे नोंद आहेत. कौशांबी जिल्ह्यातील मांझनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समदा शुगर मिल रोडजवळ झालेल्या एन्काउंटरमध्ये तो मारला गेला. गुफरान हा फरार होता. त्याच्यावर १.२५ लाख रुपयांचे रोख बक्षीस होते, अशी माहिती कौशांबीचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव यांनी दिली. (Kaushambi encounter)

गुफरानवर खून आणि दरोड्यासह सुमारे २ डझने गुन्हे नोंद आहेत. तो वॉन्टेड गुन्हेगार होता. मंगळवारी सकाळी कौशांबी येथे उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सशी (STF) झालेल्या एन्काउंटरमध्ये तो मारला गेला. यावेळी दोन्ही बाजूकडून गोळीबार झाला. कौशांबी येथे पहाटे ५ वाजता ही चकमक झाली ज्यात गुफरानला गोळी लागली. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्रयागराज विभागाचे एडीजी यांनी गुफरानवर १ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. तर सुलतानपूर पोलिसांनीही या गुन्हेगारावर २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

गुप्त माहितीच्या आधारे गुफरान कौशांबी जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीवरून एसटीएफने सापळा रचला आणि गुफरान त्यात अडकला. गुन्हेगारांना पकडण्यासाठी योगी सरकारकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

श्रीवास्तव म्हणाले की, तपास मोहिमेदरम्यान गुन्हेगार मोहम्मद गुफरानची ओळख पटली. यूपी पोलिसांच्या एसटीएफने कौशांबीच्या मांझनपूर भागातील समदा शुगर मिलजवळ त्याला घेरले. या दरम्यान गोळीबार सुरू झाला. यात तो मारला गेला. गुफरान दुचाकीवरून जात असताना एसटीएफच्या पथकाने त्याला घेरले. एन्काउंटरच्या ठिकाणी एक दुचाकीही सापडली आहे.

हे ही वाचा :

Back to top button