तिरुपती; वृत्तसंस्था : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान देशाच्या प्रत्येक राज्यात तिरुपती मंदिर उभारणार आहे. ही सगळी मंदिरे तिरुपतीच्या मंदिराची प्रतिकृतीच असणार आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थान 1933 मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी तिरुमला मंदिर, तिरुचन्नूरचे श्री पद्मावती मंदिर आणि तिरुपतीचे गोविंदराज स्वामी मंदिर एवढी तीनच मंदिरे देवस्थानच्या अखत्यारित होती. गेल्या 90 वर्षांत देवस्थानने देशभरात 58 मंदिरांची उभारणी केली आहे. त्यातील बहुतांश मंदिरे आंध्र, तेलंगणा आणि तामिळनाडूत आहेत.
हेही वाचा :