Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात सोन्याच्या थरावरून वाद | पुढारी

Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात सोन्याच्या थरावरून वाद

डेहराडून; वृत्तसंस्था : केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याच्या थर देण्यावरून वाद उद्भवला आहे. गर्भगृहाला अर्पण सोन्यात 125 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप पुजार्‍यांकडून केला जात आहे. आरोपांच्या चौकशीसाठी उत्तराखंड सरकारने समिती स्थापन केली आहे. सत्य बाहेर आणले जाईल, असे राज्याचे पर्यटन, धर्म आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी म्हटले आहे. (Kedarnath Temple)

सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवहार सचिव हरिचंद्र सेमवाल, गढवाल आयुक्त यांना चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. या समितीत तज्ज्ञांसोबत सुवर्णकारही असतील. चौकशीअंती जे कुणी दोषी आढळतील त्याच्यावर कठोवर कारवाई केली जाईल, असेही मंत्री सतपाल महाराज म्हणाले. (Kedarnath Temple)

श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती कायदा 1939 मधील तरतुदींनुसार सोन्याच्या थरासाठी राज्य सरकारकडून परवानगीही देण्यात आली होती. सोन्याचा मुलामा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली लावण्यात आला होता. दात्यानेच त्यासाठी सोने उपलब्ध करून दिले होते. मंदिर समितीची यात थेट भूमिका नव्हती. काम आटोपल्यावर त्याचे बिल देणगीदाराने मंदिर समितीकडे सादर केले होते. (Kedarnath Temple)

मंदिराच्या गर्भगृहात 23.78 किलो सोने वापरण्यात आल्याचे यापूर्वीच मंदिर समितीने स्पष्ट केले आहे. या सोन्याची किंमत सुमारे 14.38 कोटी रुपये सांगण्यात आली होती. वापरलेल्या तांब्याचे वजन 1 हजार किलोवर होते, तांब्याची एकूण किंमत 29 लाख रुपये होती. इतकेच सोने वापरले असते तर त्याची किंमत अंदाजे 137 कोटी रुपये आहे.

अधिक वाचा :

Back to top button