Uttar Pradesh Mainpuri Murder Case : उत्तर प्रदेशमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

Uttar Pradesh Mainpuri Murder Case : उत्तर प्रदेशमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या
Published on
Updated on

लखनऊ; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एकाच घरातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने स्वतःला गोळी घालून घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Uttar Pradesh Mainpuri Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२४) सकाळी मैनपुरीच्या किश्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळपूर अरसारा गावात एकाच कुटुंबातील पाच जणांची सामूहिक हत्या झाल्यामुळे परिसर हादरला. गावातील रहिवासी असलेल्या शिववीर सिंह याने त्याचे दोन भाऊ, पत्नी, भावजय, भावाची नवविवाहित पत्नी आणि मित्र यांचा धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. यानंतर त्यानेही स्वतःवर गोळी झाडून स्वत:ला संपवून घेतले. तीन जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अनेक पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. (Uttar Pradesh Mainpuri Murder Case)

ही हत्या का करण्यात आली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळपूर अरसारा गावात राहणारे सुभाषचंद्र यादव यांना शिववीर, सोनू आणि भुल्लन ही तीन मुले होती. शुक्रवारी मधला मुलगा सोनू (वय २०) याच्या लग्नाची मिरवणूक इटावा पोलीस ठाण्याच्या चौबिया भागातील गंगापूर गावातून परतली होती. (Uttar Pradesh Mainpuri Murder Case)

कोल्डड्रिंक मधून पाजले गुंगीचे औषध  (Uttar Pradesh Mainpuri Murder Case)

नववधू सोनी (वय २०) हिच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण होते. शुक्रवारी रात्री एक वाजेपर्यंत सर्वजण डीजे तालावर नाचले. रात्री शिववीरने कोल्ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या मिसळून सर्वांना दिले. सर्वजण बेशुद्ध पडल्यानंतर शिववीरने अंगणात झोपलेला भाऊ भुल्लन (वय २०), मेहुणा सौरभ (वय २६, चंदा हविलिया), भावाचा मित्र दीपक (वय 20) फिरोजाबाद यांचा खून केला.

नववधूची हत्या

यानंतर टेरेसवर झोपलेल्या सोनू (वय 22) आणि नवविवाहित सोनी यांचा ही धारदार शस्त्राने गळा चिरून शिववीरने खून केला. या हल्ल्यात आरोपीचे वडील सुभाष, पत्नी आणि मावशी गंभीर जखमी झाले आहेत. पाच खून केल्यानंतर शिववीरने घरापासून काही अंतरावर जाऊन स्वत:वर गोळी झाडून स्वत:ला संपवले.

जखमींना रुग्णालयात केले दाखल

या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिस प्रमुख विनोद कुमार अनेक पोलिस ठाण्यांच्या फौजफाट्यासह गावात पोहोचले. दोन जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. ही हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news