

बालाघाट; पुढारी ऑनलाईन : टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली मध्य प्रदेशातील एक मोठा गोरखधंदा समोर आला असून त्यामुळे संबंधित निरपराध युवकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार प्रियांश बंजारी नावाचा बँक कर्मचारी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. (Bank Scams)
बंजारी एचडीएफसी बँकेत कामाला असून त्याने मजुरी करणार्या चार युवकांना आर्थिक चक्रव्यूहात अडकवले आहे. आपल्याला टार्गेट पूर्ण करायचे आहे, अशी बतावणी करून त्याने झीरो बॅलन्स खाते सुरू करण्यासाठी या चौघांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अन्य कागदपत्रे मागवून घेतली. (Bank Scams)
वास्तवात खाती सुरू केली किंवा कसे याबद्दल त्याने या चौघांना काहीही सांगितले नाही. उलट, त्यांच्या खात्यांतून तब्बल 77 कोटी रुपयांचे व्यवहार केले. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागाची नजर या व्यवहारांवर गेली. त्यानुसार खात्याकडून चारही मजुरांना नोटिस जारी करण्यात आली. नोटिस हातात पडल्यावर चौघेही नखशिखांत हादरले. कारण, ज्यांनी आयुष्यात कधी हजारांचे व्यवहारही केले नाहीत, त्यांच्या खात्यांतून कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत. (Bank Scams)
आता या चौघांनी जिल्हाधिकार्यांपुढे आपली कैफियत मांडली आहे. आम्हाला प्रियांशकडून फसवले गेल्याचे त्यांनी शपथेवर लिहून दिले आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे.
अधिक वाचा :