“अजितदादा राजकारणातले बिग बी”, संजय राऊतांच्या विधानावर अजित पवारांची भन्नाट प्रतिक्रिया…

“अजितदादा राजकारणातले बिग बी”, संजय राऊतांच्या विधानावर अजित पवारांची भन्नाट प्रतिक्रिया…

पुढारी ऑनलाईन: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगत आहे. संजय राऊत हे प्रसारमाध्यमांसमोर थुंकले होते. त्यांच्या या कृतीवरून पवार आणि राऊत यांच्यात वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांविरुद्ध फार सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊतांनी अजित यांची स्तुती केली आहे. अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील बिग बी आहेत, असं विधान राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या विधानावर अजित पवारांनीही खळखळून हसत अगदी थोडक्यात उत्तर दिलं आहे. याबद्दल त्यांनी संजय राऊतांचे आभारही मानले आहेत.

'अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'बिग बी' आहेत' या राऊतांच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार पत्रकाराला उद्देशून म्हणाले, "ये बाबा, तुम्ही काहीही विचारता. बरं ते असं म्हणाले असतील, तर धन्यवाद संजय राऊत."

रविवार १८ जूनला मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं राज्यव्यापी शिबीर पार पडलं. यावेळी भाषण करताना संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये राहू, यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. सध्याच्या परिस्थितीत तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय भाजप आणि शिंदे गटाचा सामना करणं शक्य नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राऊत म्हणायचे, 'आमची आघाडी ही २५ वर्षे टिकणार आहे.' तेव्हा २५ वर्षे टिकेल असं वाटत होतं. पुढे एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. यामध्ये चुकीचं काय आहे?" असं अजित पवार म्हणाले होते.

अजित पवारांच्या प्रतिक्रियेवर राऊत म्हणाले की, "अजितदादांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितल्याप्रमाणे अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'बिग बी' आहेत. ते महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहेत. रविवार, १८ जून रोजी शिवसेनेचा मेळावा होता, त्या मेळाव्यात जसा विचार मांडायला हवा होता, तसा विचार मांडला. मी स्वच्छ म्हटलं की, महाविकास आघाडी २५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकावी, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. जोपर्यंत ठाकरे यांची इच्छा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकणार असं मी म्हटलं. याचाच अर्थ २५ वर्षांपेक्षा जास्त काळ महाविकास आघाडी टिकणार असा आहे असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news