Assam Flood : आसामधील पूरस्थिती गंभीर; नद्यांनी ओलांडली इशारा पातळी | पुढारी

Assam Flood : आसामधील पूरस्थिती गंभीर; नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

पुढारी ऑनलाईन : आसाममधील पूरस्थिती कायम असून, दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. दरम्यान, मुसधार पावसाने आसाम राज्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. येथील ब्रह्मपुत्रेसह इतर अनेक नद्या इशारा पातळीकडून धोकापातळीकडे वाहत आहेत. त्यामुळे याठिकाणी गंभीर पूरस्थिती (Assam Flood) निर्माण झाल्याने सुमारे ४० हजार लोक प्रभावित झाले आहेत.

पुढचे ५ दिवस आसाममधील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे, असे आसाममधील आपत्ती व्यवस्थापनाकडून स्पष्ट (Assam Flood) करण्यात आले आहे.

Assam Flood: सूमारे ४० हजार लोकांना पुराचा फटका

आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. पूरस्थिती देखील गंभीर झाली असून, ती आणखी गंभीर होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापनाकडून वर्तवली आहे. आसामधील नद्या दुथडी वाहत असून, राज्यभरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. १० जिल्ह्यांना पूराचा फटका बसल्याने सुमारे ४० हजार लोक पूरस्थितीने प्रभावित झाले आहेत, अशी माहिती आसाम (Assam Flood) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या अहवालात दिली आहे.

पुढच्या ५ दिवस अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पडत असलेल्या संततधार पावसामुळे आसामला या वर्षातील पहिल्या पुराचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, येत्या पाच दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता आयएमडीकडून वर्तवली आहे. त्यामुळे आसामधील पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा देखील अंदाज आपत्ती व्यवस्थापनाकडून दिला जात आहे.

‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा

गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून आज सोमवारी दिलेल्या बुलेटिननुसार, आसाममधील कोकराझार, चिरांग, बक्सा, बारपेटा आणि बोंगाईगाव जिल्ह्यांमध्ये मुसळधार (24 तासांत 7-11 सेमी) ते अत्यंत मुसळधार (24 तासात 11-20 सेमी) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच धुबरी, कामरूप, कामरूप महानगर, नलबारी, दिमा हासाओ, कचर, गोलपारा आणि करीमगंज या आसामममधील जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button