भोगावतीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले, ३० जुलैला मतदान तर ३१ जुलैला मतमोजणी | पुढारी

भोगावतीच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले, ३० जुलैला मतदान तर ३१ जुलैला मतमोजणी

राशिवडे ; पुढारी वृतसेवा गेल्या वर्षभरापासुन लांबलेल्या परिते ता.करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाँ. पी. एल. खंडागळे यांनी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. उद्यापासुन दि.२० जुनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. दि.३० जुलैला मतदान होणार आहे तर ३१ जुलैला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वपक्ष, गट, तट तयारीला लागले आहेत.

भोगावती कारखान्याची निवडणूक गेल्या वर्षभरापासुन लांबत चालली होती. पावसाळ्याच्या तोंडावर निवडणुक होणार की नाही? याबाबत उलटसुलट चर्चा होत असताना कारखाना प्रशासनाने निवडणुक प्राधिकरणाकडे निवडणुकीसाठी आवश्यक माहीती पुरविली. आज राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव डाँ.पी.एल.खंडागळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन निलकंठ करे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:-

दि.२० ते २७ जुन उमेदवारी अर्ज दाखल करणे, दि.२९ जून उमेदवारी अर्जाची छाननी, दि.३० जून पात्र उमेवाराच्या नावाची यादी प्रसिद्ध करणे, दि.१४ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस, दि.१७ जुलै उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप, दि.३० जुलै रोजी सकाळी ८ ते सायं ५ पर्यत मतदान, तर ३१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. प्रचारासाठी १३ दिवसांचा अवधी असुन, ऐन पावसामध्ये रणधुमाळी उडणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button