भारतीय उच्चायोगावरील हल्ल्याचा तपास एनआयए करणार | पुढारी

भारतीय उच्चायोगावरील हल्ल्याचा तपास एनआयए करणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने लंडन, कॅनडा तसेच अमेरिकेतील भारतीय उच्चायोगावर हल्ला करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. लंडनमध्ये घडलेल्या घटनेचा तपास अगोदरपासूनच राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) केला जात आहे. आता कॅनडा तसेच अमेरिकेतील घटनेचा तपासदेखील एनआयए हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मार्च २०२३ मध्ये कॅनडा आणि अमेरिकेतील सनफ्रान्सिकोत भारतीय उच्चायोगावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने गुन्हा दाखल केला आहे. तर युएपीए अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लवकरच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या गुन्ह्याचा तपास एनआयएकडे सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे.

लंडन येथील भारतीय उच्चायोगावर हल्ला करीत तिरंगाचा अपमान केल्याप्रकरणी एनआयएने यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. एनआयएचे पथक लंडनमध्ये तपास करीत असून ४५ संशयित हल्लेखोरांचे छायाचित्रही जाहीर करण्यात आले आहेत. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह विरोधात केंद्राच्या कारवाईनंतर उच्चायोगावर हल्ले करण्यात आले होते.

हेही वाचा : 

Back to top button