Biparjoy Cyclone : गुजरातमध्ये तांडव केल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ झाले कमकुवत

biparjoy cyclone 1
biparjoy cyclone 1

पुढारी ऑनलाइन डेस्क : Biparjoy Cyclone : खोल दाब निर्माण झाल्यामुळे सध्या बिपरजॉय चक्रीवादळ कमकुवत झाले आहे, अशी माहिती आज पहाटे भारतीय हवामान विभागाने दिली. तसेच पुढील 12 तासांत हा दाब आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. IMD च्या मते, आग्नेय पाकिस्तानवरील चक्रीवादळ शुक्रवारी रात्री 11:30 वाजता 'डीप डिप्रेशन' मध्ये कमकुवत झाले. चक्रीवादळ BIPARJOY शुक्रवारी रात्री 11.30 वाजता आग्नेय पाकिस्तान, दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि धोलावीराच्या सुमारे 100 किमी ईशान्येस असलेल्या कच्छवर खोल दाब निर्माण झाल्याने कमकुवत झाले, असे IMD ने ट्विटमध्ये म्हटले आहे. पुढील 12 तासांत ते आणखी कमजोर होऊन 'डिप्रेशनमध्ये' बदलेल.

Biparjoy Cyclone : तीन महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेकडो झाडे उन्मळून पडल्याने तीन राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सरकारी अहवालानुसार एकूण 600 झाडे उन्मळून पडली आहेत. नऊ पक्की आणि 20 कच्ची घरे कोसळली आहेत. दोन पक्के आणि 474 कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 65 गच्चीच्या झोपड्या तुटल्या आहेत.

Biparjoy Cyclone : 1,000 टीम वीज पुनर्संचयित करण्यात व्यस्त

वादळामुळे राज्य वीज कंपनी गुजरात विज कंपनीचे मोठे नुकसान झाले असून, खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. मदत आयुक्त आलोक कुमार पांडे म्हणाले की, किमान 4,600 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता, परंतु 3,580 गावांमध्ये पुरवठा पूर्ववत झाला आहे. सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, 1,000 हून अधिक टीम वीज पुरवठा पूर्ववत करण्यात व्यस्त आहेत.

राजस्थानकडे सरकले

गुजरातमध्ये तांडव केल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ अखेर राजस्थानकडे सरकले आहे. उदयपूरमध्ये चक्रीवादळ 'बिपरजॉय'च्या प्रभावाने दुसऱ्या मजल्यावरून काच पडली आणि कारचे नुकसान झाले. याचा व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news