Vande Bharat Express: मुंबई-गोवा, हुबळी-बंगळुरूसह पाच मार्गावर २६ जूनपासून धावणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’ | पुढारी

Vande Bharat Express: मुंबई-गोवा, हुबळी-बंगळुरूसह पाच मार्गावर २६ जूनपासून धावणार 'वंदे भारत एक्सप्रेस'

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवासह पाच मार्गावर येत्या 26 जूनपासून  वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express)  धावणार असल्याची माहिती बुधवारी (दि.१४) सूत्रांनी दिली. ओडिशामध्ये गेल्या 2 तारखेला रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच वंदे भारत रेल्वे धावणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच वंदे भारत (Vande Bharat Express)गाड्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. ज्या मार्गांवर वंदे भारत सुरू होणार आहे, त्यात मुंबई-गोवा, बंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदोर आणि भोपाळ-जबलपूर या मार्गांचा समावेश आहे. 3 जून रोजी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखविला जाणार होता, तथापि त्याच्या एक दिवस आधी ओडिशामध्ये रेल्वे अपघात झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

एकाच दिवशी पाच वंदे भारत गाड्या सुरु होत असलेली ही पहिलीच वेळ आहे. ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर पाच गाड्यांच्या शुभारंभाचा कार्यक्रम साधेपणाने घेतला जाणार आहे. याआधी 25 मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी डेहराडून ते दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत गाडीला हिरवा कंदील दाखविला होता. तर तत्पूर्वी पुरी ते हावडा दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली होती.

हेही वाचा 

Back to top button