उत्तराखंडच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा | पुढारी

उत्तराखंडच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२५) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वार उत्तराखंडच्या पहिल्या सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन दिल्ली ते डेहराडून दरम्यान धावणार आहे.

डेहराडूनला नवी दिल्लीशी जोडणाऱ्या उत्तराखंडच्या पहिल्या सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आजपासून सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, “दिल्ली ते डेहराडून दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्स्प्रेस राजधानी सोबत अधिक वेगाने जोडेल. या ट्रेनमुळे दिल्ली ते डेहराडून दरम्यानचा प्रवास बराचसा कमी होणार आहे. 2014 पासून, आम्ही भारतीय रेल्वेचा कायापालट केला आहे. हायस्पीड ट्रेन्सचे स्वप्न प्रत्यक्षात आणून आम्ही सुरुवात केली. 2014 पूर्वीच्या 600 किमीच्या तुलनेत दरवर्षी 6000 किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले जात आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button