ओडिशामधील रेल्वे दुर्घटनेमुळे मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन रद्द

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मडगाव मुंबई (Madgaon-Mumbai) वंदे भारत एक्स्प्रेसचे 3 जून रोजी होणारे उद्घाटन ओडिशामधील भीषण रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे. ओडिशामध्ये बालासोर जिल्ह्यात झालेल्या तीन रेल्वे गाड्यांच्या भीषण रेल्वे दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे प्राण गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिराने ही दुर्घटना घडली.
गोव्यात मडगाव स्टेशनवर मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार होते. मात्र रेल्वे दुर्घटनेच्या दुर्घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा
- Train Accident Coromandel Express : कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात ५० प्रवासी ठार, २०० पेक्षा जास्त जखमी
- WFI Protest : १९८३ च्या विश्वकप विजेत्या क्रिकेट संघातील खेळाडूंचा आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना पाठिंबा
- ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन एफआयआरसह १० तक्रारी; लैंगिक छळाचे आरोप| Wrestlers Protest FIR Against Brijbhushan Singh