पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाने (GDP) आज (दि.६) 3 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला. 2023 मध्ये प्रमुख विकास निर्देशक $3.75 ट्रिलियनपर्यंत पोहोचला आहे, जो 2014 मध्ये सुमारे 2 ट्रिलियन डॉलर होता, अशी माहीती केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून आज देण्यात आली. सध्या भारत ही जगातली पाचवी सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे.
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताच्या पुढे असलेल्या देशांमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी यांचा समावेश आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आकार 26.85 ट्रीलियन डॉलर्स इतका असून चीन व जर्मन अर्थव्यवस्थेचा आकार क्रमशः 19.37 ट्रीलियन डॉलर्स व 4.30 ट्रीलियन डॉलर्स इतका आहे. भारताच्या खाली जे देश आहेत, त्यात ब्रिटन (3.15 ट्रीलियन डॉलर्स), फ्रान्स (2.92 ट्रीलियन डॉलर्स), कॅनडा (2.08 ट्रीलियन डॉलर्स), रशिया (1.84 ट्रीलियन डॉलर्स) व ऑस्ट्रेलिया (1.55 ट्रीलियन डॉलर्स) यांचा समावेश आहे.
2014 साली भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावर होती. त्यानंतर अवघ्या 9 वर्षात भारताने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील चमकता तारा म्हणून भारताकडे पाहिले जात असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान जागतिक स्तरावरील पतमापन संस्था 'मुडीज'ने जून तिमाहीत जीडीपी दर 6 ते 6.3 टक्क्यांवर जाईल, अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा :